मतिमंद मुलीवर अत्याचार करणारा नराधम जेरबंद


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - मतिमंद मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी अभय बाबूराव कडू (वय 58, रा. सिंहगड रस्ता, पुणे) याला तोफखाना पोलिसांनी  अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अभय कडू (वय 58, मूळ रा. सिंहगड रस्ता, पुणे) हा बी.ए. पदवीधर असून आरसीएफ या नामांकित कंपनीतून नुकताच सेवानिवृत्त झालेला आहे. अभय हा औरंगाबाद येथून येत असताना त्याला रस्त्याने एक मनोरुग्ण मुलगी एकटीच जात असलेली आढळून आली. तिला स्वतःच्या चारचाकी वाहनातून तो पुण्याला घेऊन गेला. तिची एच.आय.व्ही.ची तपासणी करून घेतली. ही तपासणी निगेटिव्ह आल्यावर तिच्यावर एक-दीड महिना बलात्कार केला. या बलात्कारामुळे ही मुलगी गरोदर राहिली. या मुलीला पुन्हा सोडून देण्यासाठी चारचाकी वाहनातून सोमवारी (दि.20) पहाटे नगर-कल्याण महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळील निर्जनस्थळी आला. या मुलीच्या असहाय्यतेचा पुन्हा एकदा तिच्यावर चारचाकी वाहनात बलात्कार केला. या अत्याचारामुळे तिने गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला. अभय या प्रकारामुळे घाबरला. त्याने स्वतः तोफखाना पोलिस ठाण्यात मित्राची भोळसर मुलगी नगर-कल्याण महामार्गावरील उड्डाणपुलाजवळून गायब झाल्याची तक्रार दिली.

पीडित मुलगी नग्न अवस्थेत जीपीओ चौकातील जीएसटी(विक्री) भवन समोरून जात सकाळी 8 वाजता जात होती. सामाजिक काम कारणाऱ्या नागरिकांनी मनोरुग्ण महिलांसाठी कार्य करणार्‍या माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धामणे यांनी ही माहिती दिली. ही मुलगी चांदणी चौकातून जामखेड रस्त्याने जाऊ लागली. तेथे तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.  या पीडित मुलीला माऊली प्रतिष्ठानमध्ये नेण्यात आले. तिच्यावर उपचार करण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता, ती गरोदर असल्याचे आढळून आले.

तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या हरविल्याची (मिसिंग) तक्रार देणार्‍या अभय कडू याला बोलावून घेण्यात आले. त्याला मुलगी सापडल्याचे सांगण्यात आले. त्याला माऊली नेऊन मुलीला दाखवताच मुलगी मोठ्यानेे रडू लागली. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना त्याला समर्पक उत्तर देता आले नाही. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. माऊली संस्थेच्या वतीने अ‍ॅड. सुचिता धामणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अभयवर याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post