देशात करोना बाधितांची संख्या ३ लाख २० हजार २२ वर


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - भारतात करोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासात ११ हजार ९२९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख २० हजार २२ वर पोहोचली आहे.

दरम्यान गेल्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत जवळपास १२ हजाराच्या आसपास रुग्णसंख्या वाढली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३११ नवे रुग्ण दगावले असून देशात मृतांची एकूण संख्या ९ हजार १९५ वर पोहोचली आहे.

सद्य स्थितीत देशात १ लाख ४९ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु असून १ लाख ६२ हजार ३७९ रुग्णांनी करोनावर मात केली असून ते बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रलायाने दिली आहे.

देशात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात असून सद्य घडीला राज्यात एकूण १ लाख ०४ हजार ५६८ रुग्ण आढळले आहेत. सर्दी, खोकला, कफ, स्नायू दुखी, घसा खवखवणे, नाक गळणे, अतिसार ही करोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचे वैद्यकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते.

सद्यस्थितीत बेचव होणे आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे या दोन लक्षणांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली असून त्यानुसार लोकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post