करोनाच्या लढ्यात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांचा होणार सन्मान

माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाविरुद्धच्या लढ्यात आपल्या जीवाची बाजी लावून झटणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विशेष पदकानं सन्मान करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

करोनाच्या युद्धात लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची तुलना थेट लष्कराच्या जवानांसोबत केली आहे. आपले जवान चीनच्या सीमेवर शौर्य दाखवत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलिसही करोनाची ही लढाई लढत आहेत. असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलंय. त्याचबरोबर, य लढाईत अगदी ग्रामीण पातळीपर्यंत पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य निभावलं आहे. त्या सर्व पोलिसांना आपत्ती सेवा पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post