यागोष्टीसाठी राज्य सरकारचं केंद्राला साकडं


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला राज्य सरकारनं पत्र लिहिल्याचं सांगितलं. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना एसटीने प्रवास करणं कठिण जातं. एसटीपेक्षा रेल्वेने लवकर कामाच्या ठिकाणी पोहोचता येतं. प्रवास वाचतो. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. लोकल सेवा सुरू व्हावी म्हणून आम्ही रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यासाठी प्रयत्न करत आहेत. किमान अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी तरी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचं परब म्हणाले.
कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार येथून मुंबईत कामावर येणारा मोठा कर्मचारी वर्ग आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही या भागात मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईत कामावर येण्यासाठी ज्यादा एसटी सोडण्यात येणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post