काॅग्रेसचे आंदोलन : दोरीने ओढली गाडी


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक - देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून रोज पेट्रोप व डिझेलचे दर वाढत आहे. अगोदरच लाॅकडाउनमुळे लोकांची आर्थिक चणचण असताना दरवाढिमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

ते बघता इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या मागणीसाठि शहर व जिल्हा काॅग्रेसकडून सोमवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत दरवाढिचा निषेध म्हणून दोरखंडाने चारचाकि ओढण्यात आली.

आंतराष्ट्रिय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने घटत असतांना देशभरात पेट्रोल व डिझेल दरवाढीने नवा उच्चांक गाठला आहे. त्याचा निषेध म्हणून काॅग्रेस पक्षाकडून सोमवारी देशभरात आंदोलन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासूनच काॅग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आंदोलनासाठी गर्दी झाली होती. यावेळी इंधन दरवाढिचा निषेध नोंदविण्यासाठी दोरखंडाने चारचाकी ओढत वस्तुस्थितिकडे लक्ष वेधण्यात आले.

इंधन दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, केंद्र सरकारचा निषेध असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कधी नव्हे ते आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती प्रचंड प्रमाणात घसरल्या आहेत. असे असताना मागील एक महिन्यात पेट्रोल ९ व डिझेल ११ रुपयांनी महागले आहे.

केंद्र सरकारकडून त्यावर लावण्यात आलेला जादाचा कर मागे घेतला जावा अशी मागणी करण्यात आली. इंधन दरवाढीमुळे देशभरात महागाईचा भडका उडेल व त्याच्या झळा या गोरगरिबांना सोसाव्या लागतील. त्यामुळे इंधन दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ.तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डाॅ.शोभा बच्छाव, नगरसेविका डाॅ.हेमलता पाटील, माजी नगरसेवक त‍ान‍जी जायभावे, मध्य नाशिक ब्लाॅक अध्यक्ष बबलू खैर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळा हा नियम काॅग्रेसकडून पायदळी तुडवण्यात आला. दोरखंडाने चारचाकी ओढताना सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. मात्र, तोंडाला मास्क लावण्यात आले होते. पण जोरदार घोषणाबाजी करताना काहिंनी मास्क देखील काढले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post