माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : – कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, मोदी सरकारनं 30 जून पर्यंत संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारनं त्यामध्ये काही ठिकाणी सूट देखील दिली होती. दरम्यान, आज राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊन 31 जुलै पर्यंत वाढवला आहे.
या लॉकडाऊनबाबतची सविस्तर नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी आणि महापालिका परिसरातील मनपा आयुक्त गरजेनुसार त्या-त्या ठिकाणी योग्य त्या निर्बंधाचा निर्णय घेतली. सध्यातरी राज्य सरकारनं 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला होता. त्याचवेळी त्यांनी लॉकडाऊन उठणार नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. आता राज्य सरकारनं 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे.
Post a Comment