स्पा सेंटरवर छापा; डमी ग्राहक पाठवून पोलिसांची कारवाई


माय अहमदनगर वेब टीम
नाशिक -  चोरीछुप्या पद्धीने सुरू असलेल्या स्पा-मसाज सेंटरच्या नावे अवैध व्यावसाय करणार्‍या गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील स्पा सेंटरवर गंगापूर पोलिसांनी मंगळवारी (दि.9) रात्री छापा टाकला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

प्रदीपकुमार लक्ष्मण माने (30, रा. आरती सोसायटी, वैभव कॉलनी, राजीवनगर), ज्ञानेश्वर बबन गवारे (रा. सिद्धार्थ हॉटेलशेजारी, बजरंगवाडी, पुनारोड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील श्रीगणेश कुबेर कॉम्प्लेक्सच्या दुसर्‍या मजल्यावर स्पा-मसाज सेंटर आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये स्पा-मसाज सेंटर बंद करण्यात आलेले आहे.

सध्याच्या पाचव्या लॉकडाऊनमध्येही सदरील व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नाही. असे असतानाही सदरच्या स्पा सेंटरमध्ये अनधिकृतरित्या व्यवसाय सुरू असल्याची खबर गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना मिळाली होती.

त्यानुसार, उपनिरीक्षक सचिन शेंडकर यांच्यासह पथकाने सापळा रचला. डमी ग्राहक पाठवून खात्री केली असता, सदर स्पा सेंटर चालक संशयित प्रदीपकुमार माने याने डमी ग्राहकाला मसाज सेंटरमध्ये प्रवेश दिला.

त्याच्याकडून पैसे घेऊन त्याची मसाज सुरू असताना दबा धरून असलेल्या पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटरचा चालक प्रदीपकुमार माने व मॅनेजर ज्ञानेश्वर गवारे हे दोघे मिळून आले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post