'रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री म्हणतं आहे...


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रात सरकार चालत नसून सर्कस चालू आहे, या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या टिकेला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला 'सर्कस' म्हणत आहेत', अशा शब्दात नवाब मलिक यांनी राजनाथ सिंह यांच्या टीकेला उत्तर दिले.

राजनाथ सिंग यांच्या टिकेला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, 'महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चालणारे सरकार चांगले काम करत आहे. कोव्हिडबाबत मुंबई मॉडेलचे आयसीएमआरने कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंहजी, रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाहीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. अनुभवाचे बोल...' असे ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे.
राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले होते. यादरम्यान त्यांनी सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणार्‍या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत. महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. ते पाहून असे वाटते की, सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post