कोरोनाची साखळी तुटता तुटेना; शहरात पुन्हा वाढले रुग्ण


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – शहरातील नालेगाव येथील 3, आडते बाजार येथील 1, तारकपूर येथील 1 आणि तोफखाना येथील 1 जणांसह अहमदनगर जिल्ह्यात आज शनिवारी (दि.27) आणखी 15 ’कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहरात 6 बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नालेगाव 3, आडते बाजार 1, तारकपूर 1 आणि तोफखाना 1 असे रुग्ण आढळले आहेत. यातील तारकपूर येथील रुग्ण हा भोपाळ येथून प्रवास करून आला होता. याशिवाय, श्रीगोंदा तालुका 3, कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर आणि पारनेर तालुका प्रत्येकी 1 आणि राहाता तालुक्यात 2 कोरोना बाधित आढळले आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील बाधित आढळलेल्या व्यक्ती भिवंडी येथून प्रवास करून आल्या होत्या, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

दरम्यान, जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या आता 111 झाली असून एकूण नोंद रुग्णसंख्या 397 इतकी झाली आहे तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील 8 रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर जिल्ह्यात आज 8 कोरोनग्रस्त आजारातून बरे होऊन घरी परतले. यामध्ये, संगमनेर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी दोन, नगर तालुका आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 273 झाली आहे. तर, आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 15 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या ही 111 झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post