चार सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथील एका शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या नवाजीस सलिम शेख (वय 9) दानीश सलीम शेख (वय13) अरबाज सलिम शेख (वय21) फैसल सलिम शेख (वय18) या चार सख्या भावांचा शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. त्यांचा एक मावस भाऊ यात बचावला आहे. हे चारही जण मूळचे उत्तरप्रदेश मधील रहिवासी आहेत.

समजलेली अधिक माहिती अशी की उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर मधील रहिवासी असलेले सलीम अहमद शेख हे पत्नी व चार मुलांसह बाबुर्डी येथिल कैलास शिर्के यांच्या गुर्‍हाळावर कामासाठी मागील काही दिवसांपासून आले होते.

मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आई वडीलांचा डोळा चुकून नवाजीस, दानेश, अरबाज फैसल व समीर हे येथील कैलास शिर्के यांचे गुर्‍हाळाजवळील दत्ता शिर्के यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. चार भाऊ शेततळ्यात उतरले शेततळ्यात सोडलेल्या पाईपाला धरुन ते पोहत होते नवाजीस, अरबाज पाईपाला धरून पोहत होता मात्र पाईप तुटला नवाजीस अरबाज बुडू लागले.

त्यावर फैसल दानीश वाचविण्यासाठी गेला आणि चौघेही बडून मृत्यू मुखी पडले. यांच्याच जवळ असणारा त्याच्या मावस भावाने आरडा ओरड केली मात्र स्थानिक बचावासाठी येऊ पर्यन्त हे चौघे पाण्यात बुडाले होते. सदर घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला घडली याबाबत माहिती समजताच सह्यायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील पोलिस हेड कॉस्टेबल विठ्ठल बढे व पोलिस कॉस्टेबल प्रताप देवकाते हे घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post