फेशियल 500 कटिंग 100; सलूनचे नवे दर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – लॉकडाऊननंतर रुतलेल्या अर्थचक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग सलून व्यावसायिकांना सापडला. दरवाढ हा तो मार्ग असून 10 ते 20 टक्के दरवाढ करण्याचा ठराव जिल्हा सलून असोसिएशनने घेतला आहे. नव्या दरानुसार फेशियलसाठी आता पाचशे तर कटिंग 100 आणि दाढीसाठी 60 रुपये मोजावे लागणार आहे.
करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गत तीन महिन्यापासून सलून दुकाने बंद आहेत. सलून व्यावसायिकांची उपासमार सुरू आहे. वाढती महागाई आणि कुटुंबाची गुजराण करताना सलून व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी सलून असोशिएशनची बैठक झाली. त्यात दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. वाढती महागाई तसेच कौंटुंबिक व व्यावसायिक खर्चाची तोंडमिळवणी करण्याकरीता दरवाढ हाच पर्याय असल्याचे बैठकीत एकमत झाले. नव्या दरानुसार साध्या दाढीला 60 तर स्पेशल दाढीला 70 रुपये मोजावे लागणार आहेत. कटिंगच्या रेटमध्येही वीस रुपयांनी वाढ करण्यात आली. साध्या कटिंगला 100 तर फॅशनेबल कटिंगला 150 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू असणार असल्याचे असोशिएशनच्यावतीने सांगण्यात आले.
नवे रेट
कटिंग साधी 100
फॅशनेबल 150
कटलाईन 80
लहान मुलांची
कटिंग 80
लहान मुलांनी फॅशनेबल कटिंग 100
मसाज 150
हेअर कलर 100
दाढी साधी 60
दाढी स्पेशल 70
दाढी ट्रिमिंग 100
झिरो मशीन
दाढी 50
साधे ब्लीच 500
फेस मसाज 120
ब्रॅण्डेड फेस
मसाज 150
स्क्रब 150
फेशिअल 500
Post a Comment