आता किल्ला महोत्सवाचे रसीक पाऊल…




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – भुईकोट किल्ला बुरुज पडझड या संदर्भात रसिक ग्रुपच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाची पर्यटन खात्याने दखल घेतली असून ते कार्यवाहीसाठी पाठविले आहे. परंतू किल्ल्या संदर्भात कार्यवाही होत नाही तोपर्यंत रसिक ग्रुप यासाठी पाठपुरावा करणार आहे. भविष्यात लवकरच कोरोना विषाणू मुक्तीनंतर पर्यटन विकासासाठी रसिक ग्रुप किल्ला महोत्सव आयोजित करून शहराचे नाव सर्वदूर करण्यासाठी प्रयत्न करेल असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी केले.

आज पर्यंत रसिक ग्रुपच्या पुढाकारातून गेली तीस वर्षे शहराचा वर्धापनदिन विविध ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी संगीत मैफिल, गझल, काव्य, आयोजित करीत शहराच्या या वास्तूंना पर्यटनास चालना मिळण्यासाठी प्रयत्न करीत आला आहे. या सर्व कार्यक्रमांना नगरकरांनी मोठा प्रतिसाद देत शहराविषयी प्रेम व्यक्त केले आहे.
रसिक ग्रुपचा गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सव गेल्या वीस वर्षांपासून हजारोंच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होतो.

या कार्यक्रमास महाराष्ट्रातील, भारतातील नामवंत कलाकार आपला सहभाग देत हजारो रसिकांना आनंद दिला आहे. या सोहळ्यास केवळ अहमदनगर मधूनच नव्हे तर महाराष्ट्रातून रसिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अहमदनगरचा हा गुढीपाडवा महोत्सव गुढीपाडव्याचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा म्हणून प्रसिद्धीस आला असून हा अहमदनगरची ओळख झाला आहे.

नगरकरांनी आजपर्यंत रसिकला भरघोस प्रतिसाद दिला आहे. भविष्यात कोरोना विषाणू संकट निवळल्यानंतर प्रशासनाच्या मार्गदर्शनाने हा सांस्कृतिक सोहळा साजरा होताना तसाच प्रतिसाद देतील. असा विश्वास आहे. आपल्या ऐतिहासिक शहराचे नाव पर्यटनाच्या दिशेने देशात मोठे व्हावे. असे येलुलकर म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post