ब्रीच कॅंडी रुग्णालयातुन डिस्चार्जमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आता करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून आज, २२ जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

मुंडे यांना पुढील १४ दिवस घरातच क्वारनटाईन मध्ये ठेवण्यात येणार आहे हा अवधी पूर्ण होताच ते लगेचच कामात रुजू होतील. प्राप्त माहितीनुसार, धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांनी करोना चाचणी केली होती, १२ जूनला मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते.

यानंतर त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील ११ दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते.

प्राप्त माहितीनुसार, धनंजय मुंडे हे बीडहून मुंबईत आले असता त्यांच्या सहकाऱ्यांमधील ५ जणांना करोनाची लागण झाल्याचा संशय होता. या सहकाऱ्यांमध्ये करोनाची लक्षणे दिसली नव्हती तशीच मुंडेंच्या बाबतही कोरोनाचे लक्षण दिसले नव्हते. मात्र श्वसनाचा त्रास झाल्यावर सहकाऱ्यांसह धंनजय मुंडे यांची सुद्धा करोना चाचणी घेण्यात आली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post