विठ्ठल-रुक्मिणीचे आता ऑनलाईन थेट दर्शन



माय अहमदनगर वेब टीम
पंढरपूर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद असून पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदीरदेखील बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना आता घरबसल्या विठ्ठल-रुक्मिणी मातेचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे श्री विठ्ठलरुक्मिणीचे मंदीर दर्शनासाठी बंद असून या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. मंदिर बंद असल्याने भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाची आता ऑनलाईन थेट सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

असे होणार ऑनलाईन थेट दर्शन

संकेतस्थळ – http://www.vitthalrukminimandir.org

गुगल प्ले स्टोअरवरील – shreevitthalrukmnilive Darshan

जिओ टीव्ही- जिओ दर्शन

टाटा स्काय- क्टिव्ह चॅनेल

वरील विविध माध्यमांतून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार भाविकांना पाहता येणार आहे. 1 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post