जिल्ह्यात झाला एवढा पाऊस
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत असून, बुधवारी (दि. 17) सायंकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. शहरातील काही भागात हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. गुरुवारी (दि.18) दिवसभर काळ्या ढगांनी आकाश दाटले होते. अधून-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मागील वर्षी 18 जूनपर्यंत सरासरीच्या 5.49 टक्के पावसाची नोंद झाली होती. यावर्षी 32.55 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपाच्या मशागतीसह पेरणीच्या कामालाही वेग आला आहे.
गुरुवारी सकाळपर्यंत 24 तासात अकोले- 6 मि.मी., संगमनेर- 22 मि.मी., कोपरगाव- 2, श्रीरामपूर- 1, राहुरी- 19.2, नेवासा- 4, राहाता- 23, नगर- 6, शेवगाव- 1, कर्जत- 1, श्रीगोंदा- 1, जामखेड- 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Post a Comment