'या' प्रयोगशाळेत करोना चाचण्या करण्यास बंदी



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईतील मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेवर चार आठवड्यांसाठी करोना चाचण्या करण्यास महापालिकेनं बंदी आणली आहे. प्रयोगशाळेकडून करोना चाचणीचे आहवाल उशिरानं मिळत असल्यानं मुंबई महापालिकेनं ही कारवाई केली आहे.

मुंबईत करोनाची रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळं पालिकेच्या या निर्णयामुळं चाचण्या करण्याचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना चाचण्यांचे अहवाल उशिरा मिळत असल्यानं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत प्रसंगी, करोनाबाधितांवर उपचार करण्यासही विलंब होतो. त्यामुळं रुग्णांचा मृत्यूही होण्याची भिती आहे. असं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post