शेतकर्‍याच्या डोक्यात धारदार शस्त्राने केले वार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- काहीही कारण नसताना 24 वर्षीय शेतकर्‍याच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून जखमी केल्याची घटना चांदबीबी महालाच्या खाली फॉरेस्ट कार्यालयाजवळ मंगळवारी (दि.9) दुपारी घडली. याबाबतची तक्रार बुधवारी (दि.10) दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देण्यात आली.

याबाबतची माहिती अशी की, रतडगाव येथील तरूण शेतकरी सुनील दत्तु शिंदे (वय-24) हा चांदबीबी महालाच्या खाली असलेल्या फॉरेस्ट कार्यालयाजवळुन जात असताना प्रविण रामदास वाघुले (रा. रतडगाव) याने पाठीमागुन येऊन धारदार शस्त्राने सुनील याच्या डोक्यात वार केला. यात सुनील हा गंभीर जखमी झाला आहे.

या प्रकरणी सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक आबनावे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post