एकास चोपले; परस्परविरोधी फिर्यादी दाखल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- आगरकर मळा येथील 21 वर्षीय तरूणास 4 ते 5 जणांनी बेकायदेशीररित्या एकत्र येऊन काहीतरी टणक वस्तु व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.10) दुपारी 12.30 च्या सुमारास स्टेशन रोडवरील आगरकर मळा येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, अक्षय भाऊसाहेब मोढवे (वय 21, रा. आगरकर मळा, बेल्हेश्‍वर कॉलनी) हा घराबाहेर बसलेला असताना तेथे भुषण सुपेकर, अक्षय अकोलकर, सुनील वर्मा, संकेत सातपुते, सागर म्हस्के (सर्व रा. केडगाव) हे जमावाने आले. त्यांनी अक्षय याच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तुने तसेच गुडघ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.

या प्रकरणी अक्षय मोढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 324, 143, 147, 188, 269, महाराष्ट्र कायदा कलम 37 (1) (3), 135 प्रमाणे मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कचरे हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post