48 तासांत 140 पोलिसांना करोनाची लागणमाय अहमदनगर वेब टीम
मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोविड योद्धेही करोनाचे शिकार बनत आहेत. गेल्या 48 तासांत 140 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

याचबरोबर एकूण करोनाबाधित पोलीस कर्मचार्‍यांची संख्या 3 हजार 960 झाली आहे. यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या 46 जणांचा व उपचारानंतर बरे झालेल्या 2 हजार 925 जणांचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. तर, सध्या 986 करोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post