पाच लाखाची लाच स्वीकारताना




माय अहमदनगर वेब टीम
पुणे – तक्रार अर्ज मागे घेऊन चौकशी बंद करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकास पाच लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. फारुख याकुब सय्यद सोलापुरे असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. फारुख सोलापुरे यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या साने पोलीस चौकीत नेमणूक करण्यात आली होती.

यातील तक्रारदार यांनी पिंपरी- चिंचवड भागातील चिखली मोरेवस्ती येथे इमारत बांधली असून त्यामधील सहा फ्लॅट विकलेले आहेत. त्यांनी फ्लॅट ज्यांना विकले आहेत त्यांचेकडून पैसे येणे बाकी आहे.त्यासाठी तक्रारदार यांनी दि. 29 मी 2020 रोजी तक्रारअर्ज चिखली पोलीस स्टेशन येथे दिलेला होता.तो अर्ज चौकशीसाठी पोलीस उपनिरीक्षक सोलापुरे यांचेकडे आहे.सदर अर्जावरून गैरअर्जदार यांचेवर कारवाई करण्यासाठी व येणे बाकी असलेले पैसे मिळवून देण्यासाठी सोलापुरे यांनी पाच लाखाची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाला माहिती दिली. त्यानुसार सापळा लावण्यात आला व सोलापुरे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post