....लखनऊला धावली श्रमिक रेल्वे



माय अहमदनगर वेब टीम
पुणे  – कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर, विद्यार्थी व इतर नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकारचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने आज पुणे रेल्वे स्टेशनहून लखनऊ येथे श्रमिक रेल्वे रवाना करण्यात आली. सुमारे बाराशे प्रवाशांनी या रेल्वेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला प्रयाण केले.

लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या परराज्यातील मजूर विद्यार्थी आणि नागरिकांसाठी श्रमिक रेल्वे या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी परप्रांतीय मजुरांच्या रेल्वे तिकीटाचा सर्व खर्च उचलण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्यमंत्री डॉ. कदम यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीय नागरिकांसाठीच्या रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले. राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांनी त्यासाठीचा समन्वय केला व आर्थिक बाजू सांभाळली. त्यामुळेच आज तिकीटासाठी एकही रुपया न देता या बाराशे मजुरांसाठी आपल्या या गावी परतण्याचा मार्ग खुला झाला. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशनहुन लखनऊला ही विशेष श्रमिक रेल्वे निघाली. आपल्या गावी परतणे शक्य झाल्याचा आनंद या प्रवाशांनी व्यक्त केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post