घरमालक मिर्झा आणि भाडेकरु बांकेच्या तू-तू, मैं-मैंने सजला आहे



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या बहुप्रतिक्षित 'गुलाबो सीताबो' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 41 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांच्यातली तू तू मैं मैं लक्ष वेधून घेते. बिग बींनी हवेलीचे मालक मिर्झाची भूमिका साकारली आहे, तर आयुष्मान त्यांचा भाडेकरु असून त्याचे नाव बांके आहे.
 कहाणीला इमोशनल अँगल 
ट्रेलरमध्ये मिर्झा फातिमा महल नावाच्या हवेलीचे मालक असल्याचे समजते, तर बांके त्यांचा भाडेकरु आहे. बांकेला हवेली सोडायची नाही, तर मिर्झा यांना काहीही करुन बांकेकडून घर खाली करुन घ्यायचे आहे. याचेच मजेशीर चित्रण यात करण्यात आले आहे. कथेत भावनिक बाजुही बघायला मिळतेय. मिर्झा यांना स्वतःचे मुल नाही आणि बांकेचे वडील नाहीत. त्यामुळे या दोघांचे नाते कसे फुलत जाणार हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे.
अमिताभ-आयुष्मान यांनी त्यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करुन दिली
ट्विटरवर ट्रेलर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, "मिर्झाला भेटा, जो त्याच्या वाड्याच्या प्रेमात आहे." त्याचवेळी आयुष्मानने आपल्या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली आहे. त्याने लिहिले आहे, "भेटा बांकेला. शहाणपणा याच्यापासूनच सुरु होतो."



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post