महापालिकेच्या विलगीकरण कक्षासाठी १०० बेडच्या साहित्याची मदत : आमी संघटना व रोटरी मिडटाऊन चा उपक्रम


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: - नगर एमआयडीसी मधील उद्योजकांची संघटना असलेल्या ‘आमी’ आणि नगरच्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब अहदनगर मिडटाऊन या संस्थांच्या वतीने महापालिकेने सुरू केलेल्या करोना विलगीकरण कक्षासाठी १०० बेडचे साहित्य ‘रोटरी’ चे अध्यक्ष डॉ. प्रदीप चोभे व आमी चे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी मनापा उपायुक्त सुनील पवार यांच्या कडे बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सुपूर्द केले.

महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची चांगली अंमलबजावणी करत असल्याने नगर मध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. परंतु येणाऱ्या काळात पर राज्यातून व जिल्ह्यातून नगर मध्ये हजारो नागरिक येणार आहेत. या सर्व नागरिकांना विलागिकरण करण्यासाठी आणि भविष्यात कोरोना बाधितांची रुग्ण वाढल्यास त्यासाठी नगर शहरात व्यवस्थापन तयार असण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने विलागीकरण कक्ष आणि एम्स हॉस्पिटल येथे देडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या दोन्ही सेंटर्स साठी भरपूर साहित्यांची गरज आहे. ही गरज ओळखून आमी आणि रोटरी मिडटाऊन या दोन्ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन महापालिकेला उच्च दर्जाचे १०० बेडचे साहित्य पुरवले आहे.

यावेळी बोलतांना उपायुक्त सुनील पवार म्हणाले, नगर मध्ये करोनाचा प्रसार चांगल्यापैकी नियंत्रणात आहे. मनापा प्रशासन अहोरात्र यासाठी प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. जनताही भरपूर सहकार्य करत आहे. मनपाच्या या कार्याला अजून बरीच सुविधांची गरज आहे. रोटरी व अमी या सामाजिक संघटना स्वतःहून पुढे येऊन मनपाच्या विलगीकरण कक्षासाठी केलेली मदत अत्यावश्यक आहे. या मदतीबद्दल मनापा दोन्ही संस्थाचे आभारी आहे.

डॉ. प्रदीप चोभे म्हणाले, रोटरी क्लब मिडटाऊन या संस्थेने समाज कार्याचा विडा उचलला असून जिथे गरज आहे तेथे आम्ही स्वतःहून पोहचत असतो. लॉकडाऊन मध्ये अनेक ठिकाणी गरजू बंधू भगिनींना अन्नधान्यचे वाटप करण्यात आलेले आहे. आता याच सामाजिक दाविव्यतून मनपाला आमी संघटनेला बरोबर घेत उच्च दर्जाचे १०० बेडचे साहित्य पुरवले आहे. पुढील काळातही शहरात करोना वाढू नये यासाठी सर्वांनीच खबरदारी घेऊन मनपाला सहकार्य करावे.
आमी चे अध्यक्ष श्री. राजेंद्र कटारिया म्हणाले, आमी संस्थेच्या वतीने कोरोना संदर्भात अनेक मदतीचे उपक्रम राबविले आहेत. लॉकडाऊन मुळे आज एमआयडीसी मधील कारखाने बंद असल्याने ओद्दोजक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीतही शहरातील अमी संघटनेच्या सदस्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधी साठी भरघोस मदत केली आहे. त्याचबरोबर आता मानापालाही मदत केली आहे.

आमी संघटना व रोटरी क्लबचे समंवयक क्षितिज झावरे यांनी प्रास्ताविक केले. आभार रोटरी चे सेक्रेटरी अॅड. हेमंत कराळे यांनी मानले. यावेळी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, दौलत शिंदे, दिलीप अकोलकर, अशोक सोनवणे, अॅड.अभय राजे, अमोल घोलप, जयद्रथ खाकळ, सुमित लोढा आदि उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post