अहमदनगरमधील २३ वर्षीय युवक कोरोनामुक्त


बूथ हॉस्पिटल मधून आज मिळाला डिस्चार्ज । जिल्ह्यात आतापर्यंत ३५ जण झाले कोरोनामुक्त

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जामखेड येथील २३ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाला आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्याचे १४ व्य दिवसा नंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाल्याने त्याला सोडण्यात आले.त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३५ झाली आहे.

जामखेड येथील एका मृत कोरोना बाधित व्यक्तीच्या मुलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आल्याने या युवकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर या रुग्णावर बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काल १४ दिवस झाल्यानंतर त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर, आजचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.
Previous Post Next Post