युवकाचा धारधार हत्याराने सपासप वार करून खून


माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा – श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८ वर्षे रा. आढळगाव) या युवकाचे गळा, छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणात वार करून धारदार हत्याराने जिवंत मारण्यात आले.

याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मयत मुकुंद याचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादेवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील शनिवार दि. २ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मुकुंद जयसिंग वाकडे हा ट्रकटरच्या सहाय्याने स्वतःच्या मालकीची शेतजमीन गट नं. १३३/१ मध्ये डाळिंबाचे पिकावरती फवारणी करण्याकरिता गेला होता. त्यानंतर शेतातील पाईप लाईनचा वाल फिरवण्यासाठी त्याचे वडिलाने मोबाईलवरून त्याला तीन ते चार वेळा फोन केला मात्र मुकुंद याने फोन उचलला नाही.त्यानंतर सुमारे १०.१५ च्या सुमारास विजय लहानू वाकडे याने फोनकरून सांगितले की, मुकुंद यांच्या गळ्याला तार लागून जखमी झाला आहे. ताबडतोब डाळींबच्या शेतात या असे सांगितल्यावर मुकुन्दायाचे आई, वडील व भाऊ डाळींबच्या शेतात जाऊन पहिले असता मुकुंद हा त्याच्याकडील ट्रकटर जवळ पडल्याला व त्याच्या गळ्यावर तसेच छाती, दोन्हीही हाताच्या पंजावर आणि गुप्तांगावर मोठ्या प्रमाणावर जखम झालेली होती व तो मयत झालेला होता. त्यानंतर त्यास त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याचे शव श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते.याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर देण्यात आली. या घटनेची माहिती श्रीगोंदा पोलीस स्टेशनला समजताच अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून हा खुनाचा प्रकार असावा त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने शोधमोहीम सुरु केली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post