हॉटेल, रेस्तरॉसह मॉल आणि धार्मिक स्थळे उघडणार ; कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देश आता अनलॉक होणार आहे. सरकारने यासाठी शनिवारी नवी गाइडलाइन जारी केली. याअंतर्गत 8 जूननंतर अटी आणि शर्तींसह हॉटेल, रेस्तराँ, शॉपिंग मॉल्स आणि धार्मिक स्थळे सुरू होणार आहेत. देशभरात फक्त कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत कायम राहणार आहे. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे.शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्येच होईल. आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि सामान्य लोकांसाठी सिनेमा हॉलसारखी जागा सुरू करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post