अहमदनगरमध्ये १३ नवीन कोरोना बाधित ; 4 जण ठणठणीत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - सकाळी आलेल्या अहवालात ०९ व्यक्ती बाधीत आढळून आल्या नंतर सायंकाळी पुन्हा ०४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. सकाळी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोरजळगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४ असे रुग्ण आढळून आले होते.

सायंकाळी प्राप्त अहवालात ०४ व्यक्ती बाधीत आढळून आल्या. यामध्ये (कर्जत) येथील ५३ वर्षीय व्यक्ती बाधीत. पुण्यास नोकरीला असणाऱ्या पत्नीस भेटून गावी आला होता. घाटकोपरहून टाकळीमिया (राहुरी) येथे आलेल्या १७ वर्षीय मुलगी यापूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेची नातेवाईक आहे. निमगाव (राहता) येथील बाधीत महिलेचा २० वर्षीय नातवाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर सायन (मुंबई) येथून केलुगण (ता. अकोले) येथे आलेल्या ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती सायन रुग्णालयात ड्रेसर म्हणून काम करत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद (०८ अहमदनगर + ०३ मुंबई) झाली आहे तर एकूण रुग्णसंख्या ११७ झाली आहे.

*जिल्ह्यात आतापर्यंत ११ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
(०८ अहमदनगर + ०३ मुंबई)

*जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ११७*

(महानगरपालिका क्षेत्र १८, अहमदनगर जिल्हा ६०, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा २९)

*जिल्हयातील ऍक्टिव्ह केसेस ४१ (+०२ नाशिक, +१ संगमनेर)*

* एकूण स्त्राव तपासणी २२७७

निगेटीव २०९७ रिजेक्टेड ०२५ निष्कर्ष न निघालेले १५ अहवाल बाकी २१

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post