बाबो! टेम्पोत टरबूजाखाली सुंगधी तंबाखुची वाहतूक ; दोघांना बेड्या


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली टेम्पोतून टरबुजाखाली सुंगधी तंबाखू लपवून विक्रीसाठी वाहतूक होत असणारा १५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमालासह दोघे अटक करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही काटवन खंडोबा रोडवर कारवाई केली.

रमजान मन्सूर पठाण (वय २८, रा.संजयनगर,अ.नगर), अयाज इस्साक बागवान (वय ३९, रा.गाझीनगर, काटवान खंडोबा रोड, अ.नगर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.

नगर शहरातील काटवन खंडोबा रोडवर मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून टाटा ९०९ टेम्पो (एमएच ०४, डिके ५२६८) पकडण्यात आला. टेम्पोची तपासणी केली असता, ९ हजार रुपयांच्या १ किलोच्या टरबुजाखाली ९ लाख ४५ हजार रुपयांची सुंगधी तंबाखू प्रत्येकी १० किलो वजनाच्या १०५ बँग मिळून आल्या. असा टेम्पोसही १५ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. पकडण्यात आलेल्याकडून पोलिसांनी माहिती घेतली असता, तंबाखू ही जुबेर (औरंगाबाद) यांच्या कडून विकात आणल्याची माहिती दिली. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती दिली. मुद्देमाला जप्त करून कोतवाली पोलिस ठाण्यात पोकाँ संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार यांच्या सूचनेनुसार पोहेकाँ बाळासाहेब मुळीक, संदीप घोडके, पोना सचिन आडबल, रविंद्र कर्डिले, पोकाँ संदिप दरंदले, रविंद्र घुंगासे, आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post