पैशाच्या वादातून अहमदनगरमध्ये मर्डर


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - पैशाच्या वादातून पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती एकाच खून झाल्याची घटना घडली. पत्ते खेळताना पैशाच्या वादातून ही घटना घडलीची प्राथमिक माहिती समजते. नंदकिशोर गणपत मंचरे (वय ५२, रा.तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, लाँकडाऊनमुळे नागरिक विविध माध्यमातून आपली करमणूक होण्यासाठी पत्ते सारखे खेळ निवडत आहेत. पाईपलाईन रोडवरील तागडवस्ती भागात काहीजण शनिवारी (दि.१६) दुपारच्या दरम्यान, जांभळी च्या झाडाखाली पत्त्याचा जुगार खेळ खेळत होते. या कालावधीत पैशाच्या कारणीतून भांडणे झाली. ही भांडणे मोठ्या हाणामारीने झाले. या भांडणात मंचरे याला त्या पत्ते खेळणाऱ्या जोडीदाराने दगडाने मारले. त्यात मंचरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान, ते मयत झाले. या घटनेची माहिती मिळताच, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, तोफखाना पो.नि.मुलानी यांच्या सह घटनास्थळी भेट दिली.

या घटनेतील आरोपी सचिन नानासाहेब भाजने (वय ३३, रा.तागडवस्ती,पाईपलाईन रोड,अ.नगर) याला सायंकाळी अटक करण्यात आली. तसेच जागा मालक अशोक भिटे व पत्ते खेळणारे साथीदार अविनाश तागड व दत्तात्रय साळवे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post