लाहौरवरुन कराचीला येत असलेल्या विमानाचा अपघात, विमानात होते क्रूसह 98 प्रवासी



माय अहमदनगर वेब टीम
कराची - पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक पॅसेंजर विमान एअरबस ए-320 शुक्रवारी कराचीजवळ क्रॅश झाले. हे विमान लाहौरवरुन कराचीला येत होते. काही तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. विमानात क्रू मेंबर्ससह 98 लोक होते. यात 85 प्रवासी इकोनॉमी क्लासमधील आणि 9 पॅसेंजर बिझनेस क्लासमधील होते.
घरांवर कोसळले विमान
या विमान अपघाताचे काही फोटोज समोर आले आहे. विमान कराची विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या जिन्ना गार्डन परिसरातील मॉडल कॉलोनीमध्ये क्रॅश झाले. या परिसराला मलीर म्हटले जाते. विमान घरांवर कोसळल्याने अनेक घरांमध्ये आग लागली. काही घरांमधून धूर निघत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घरांमध्ये अनेकजण अडकले आहेत.
क्रॅशनंतर कराचीच्या मॉडल कॉलोनीमधील घरांना लागलेली आग.
10 वर्षे जुने होते विमान- पीआईए
पीआईएच्या प्रवक्त्याने जियो न्यूजला सांगितल्याप्रमाणे- विमान 10 वर्षे जुने होते. विमानाच्या लँडींग गिअरमध्ये तांत्रिक अडचण होती. विमानात पायलट सज्जाद गुलसह एक को पायलट, तीन एअर होस्टेसदेखील होत्या. या अपघातात कोणत्याही व्यक्तीची जिवंत राहण्याची आशा फार कमी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post