Moto G8 पॉवर लाइट लाँच, पाहा किंमतमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - स्मार्टफोन कंपनी मोटोरोला  (Motorola) ने जी सीरजचा नवीन लेटेस्ट स्मार्टफोन मोटो जी ८ पॉवर लाइट (Moto G8 Power Lite) लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच, जबरदस्त कॅमेरा आणि प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. याआधी कंपनीने नवीन वर्षाची सुरुवातीला जी ८ पॉवरला बाजारात उतरवले होते. मोटो जी ८ पॉवर लाइटचा लूक आधीच्या मोटो जी८ सारखाच आहे.


Moto G8 पॉवर लाइटची किंमत १६९ यूरो म्हणजेच जवळपास १३ हजार रुपये आहे. या फोनला दोन रंगात म्हणजेच रॉयल ब्लू आणि आर्टिक ब्लू मध्ये खरेदी करता येवू शकते. परंतु, या फोनचा सेल कधी सुरू होणार आहे, याबद्दल कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही.

Moto G8 पॉवर लाइटचे खास वैशिष्ट्ये
या फोनच्या फीचर्सवर नजर टाकल्यास या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन ७२९x१६०० पिक्सल आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी ३५ आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मिळणार आहे. हा फोन अँड्रॉयड ९ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Moto G8 पॉवर लाइटचा कॅमेरा
मोटोरोला कंपनीने या फोनमध्ये ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये युजर्संना ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post