'त्यांचे' कोरोना अहवाल निगेटिव्हमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -  जील्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यांपैकी 59 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यात, सर्जेपुरा (नगर) येथील 23, पाथर्डी तालुक्यातील 15, कोपरगाव येथील 14 व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
कोपरगाव येथील बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील व्यक्तींचे स्त्राव नमुने शनिवारी पुण्यला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याशिवाय, पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील काही व्यक्तींचे स्त्राव नमुनेही पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. निगेटिव्ह अहवाल आलेल्यामध्ये राहुरी येथील 3 आणि अकोले आणि श्रीरामपूर येथील प्रत्येकी एका व्यक्ती, नगरच्या सर्जेपूरामधील 23, नगर शहरातील अन्य 2 अशा 59 व्यक्तींचे अहवालचा यात समावेश आहे.

दोघे अतिदक्षता विभागात
कोपरगावमधील कोरोना बाधीत 60 वर्षीय महिला आणि नगर शहरातील मुकूंदनगरमधील 76 वर्षीय गृहस्थांना जिल्हा सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती स्थिर असून खबरदाराची उपाय म्हणून यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

‘सारी’ सदृष्यचे 12 रुग्ण
जिल्ह्यामध्ये सारी सदृष्यचे (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) 12 रुग्ण सापडले आहेत. यासर्वांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात सारीच्या रुग्णांसाठी 20 बेडचा स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये आढळणार्‍या सारीफच्या रुग्णांचे सुद्धा घशाचे स्त्राव नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. सारी व करोना या दोन्हींची लक्षणे काहीशी सारखीच आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांना सारीच्या रुग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रविवारपर्यंत सारीसदृष्य रुग्णांची माहिती प्राप्त झाली आहे. या रुग्णांसाठीही जिल्हा रुग्णालयातून स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असून ते त्याला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post