कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन गरजु नागरीकांना साहित्‍याचे वितरण


माय अहमदनगर  वेब टीम
अहमदनगर – संपुर्ण अहमदनगर लोकसभा मतदार संघात शोशल डिस्‍टसिंगचा नियम पाळुन तालुका निहाय आढावा घेवून कोरोना संकटाच्‍या पार्श्‍वभूमिवर जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन गरजु नागरीकांना खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या हस्‍ते साहित्‍याचे वितरण करण्‍यात आले. या राष्‍ट्रीय आपत्‍तीतही सामान्‍य माणसाला दिलासा आणि आधार देण्‍याचे काम करु, अशी ग्‍वाही खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

कोरोनाचे संकट ही तर राष्‍ट्रीय आपत्‍ती आहे. या प्रसंगी सामान्‍य माणसाला दिलासा देण्‍याचे मोठे काम सरकारी यंत्रणेबरोबरच सेवाभावी संस्‍था तसेच जबाबदार नागरीकांना करावे लागणार आहे. जनसेवा फौंडेशनन यामध्‍ये खारीचा वाटा उचलत असुन, या आपत्‍तीच्‍या काळात कोणताही माणुस उपाशी राहाता कामा नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्‍या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच जनसेवा फौंडेशनही जबाबदारीची भूमिका पार पाडेल असे डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

या बैठकीमध्ये धान्य पुरवठा, जनधन योजनेतील पैसे जमा होणे, संजय गांधी योजनेतील पैशांचे वर्गीकरण, तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टँकरचे प्रश्न, क्वारंटाईन असलेले रुग्ण व आरोग्य सुविधा याबाबत आधिका-यांशी चर्चा करुन भविष्‍याच्‍या दृष्‍टीने करावयाच्‍या उपाय योजनांबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले.  या राष्‍ट्रीय संकटात जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातुन शासन यंत्रणेला कोणतीही मदत लागली तरी, आमचे सहकार्य राहील याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

या बैठकीस तहसीलदार, प्रांत व तालुका आरोग्य अधिकारी, अन्नधान्य पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार, गटविकास आधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

आज प्रथमतः वडगाव गुप्ता, नवनागापूर व निंबळक या तीन गावांमध्ये धान्य वाटप उपक्रमाला सुरुवात केली असून, पुढील काही दिवसांमध्ये इतर गावांपर्यंत आम्ही पोहोचू. तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत हे वाटप कार्य करण्यात येत असून, गरजू नागरिकांच्या घरांपर्यंत जाऊन रेशन किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सदर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी, माजी सरपंच व सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या महत्वपूर्ण सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या रेशन वाटपाच्या वेळी जनसेवा फाऊंडेशनचे सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post