नगर मधील तिसरा कोरोना बाधित रुग्ण बरा होवून घरी परतला
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – नगर जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही
ही चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले.

या पूर्वी नगरमध्ये आढळलेले २ कोरोनाबाधित रुग्ण यशस्वी उपचार घेवून बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. आता तिसरा रुग्ण ही घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत. या पैकी १०३ अहवाल शुक्रवारी (दि.१०) सकाळी प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या अहवालाचा समावेश आहे. तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास आरोग्य यंत्रणेने शुभेच्छा देऊन घरी रवाना केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post