महाराष्ट्रातील लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढण्याची शक्यता
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. हा लॉकडाउन उठवला जाणार की वाढवला जाणार याबद्दल सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात न आल्याने हा लॉकडाउन वाढवला जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाउन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याला आर्थिक मदत दिली जावी अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली असल्याचंही कळत आहे.
देशात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच राज्यात उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली होती. मात्र राज्यातील करोनाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. देशात सर्वात जास्त करोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात शनिवारी करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. मुंबई आणि पुण्यात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post