गरजूंच्या मदतीसाठी आ. जगताप सरसावले ; घरपोच सात हजार कुटुंबांना देणार किराणा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत जाहीर करण्यात आले आहे. हे लॉकडाऊन लक्षात घेऊन आ. संग्राम जगताप पुढील १0 दिवस गरजूवंतांना सुमारे सात हजार कुटुंबांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरपोच किराणा देणार आहेत. त्यामुळे कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शासन व प्रशानाच्या नियमांचे प्रत्येकांनी अंमलबजावणी करावी. आजोबा बलभिम जगताप व वडील आमदार अरुणकाका जगताप यांच्या वारकरी विचारांची प्रेरणा घेऊन आ. जगताप यांनी शहरामध्ये अनेकांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. याला अनेक व्यापाऱ्यांनी, उद्योजक व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यांचा नगर शहरामध्ये दोन वेळेस महापौर, दुसऱ्यांदा आमदार असल्यामुळे प्रत्येक भागाचा परिचय असल्यामुळे सर्व गरजवंतांना किराणा माल पोहोच होणार आहे. कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी गरजवंत सात हजार कुटुंबांना किराणा माल घरपोच देण्यासाठीची तयारी सुरु आहे. याची पाहणी करताना आ. संग्राम जगताप व सत्यम गुंदेचा.


आ. संग्राम जगताप म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले. हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे. उद्योगधंदे बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये व कोणीही घराबाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजवंतांना घरपोच किराणा देण्याचा निर्णय घेतला आहे. मी नगरवासियांना प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आवाहन केले की, प्रत्येकांनी मदतीचा हात द्यावा. त्यामुळे नगरकरांनी मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिल्यामुळे मी गोरगरिब कुटुंबांना किराणा माल देऊ शकतोय. यामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीठ सुमारे २५ टन, साखर ५ टन, तूर ५ टन, तेल ५ हजार लीटर, बेसपीठ अडीच टन, मसाले, चहा पावडर, जीरे, मोहरी, बिस्कीटे, मीठ, लाईफबॉय व रिन साबन यामध्ये दिले जाणार आहेत. कोणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचा प्रत्येक प्रतिनिधी घरपोच सेवा देईल, असे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post