राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 536 वर


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. महाराष्ट्रात कोरोना अनियंत्रित होत आहे. शनिवारी मुंबईत चार संक्रमितांचा मृत्यू झाला. तर दुपापर्यंत 47 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यामध्ये सीआयएसएफच्या 11 जवानांचा समावेश आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 537 झाला आहे. यातील 376 मुंबई शहरात आहेत. मुंबईतील चौघांच्या मृत्यूसह राज्यातील मृतांचा आकडा 30 वर पोहोचला आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज मेळाव्यात सहभागी झालेल्या लोकांना मोठया प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर देशात खळबळ उडाली होती. त्यानंतर प्रत्येक राज्याने सदर मेळाव्यात सहभागी झालेल्या लोकांचा युध्दपातळीवर शोध घेण्यात आला. पुणे विभागातील पाच जिल्हयातील एकूण 258 जणांपैकी 163 जण आतापर्यंत मिळून आले असून त्यांना रुग्णालयात तपासणी करुन क्वारंटाइन करण्यात आले आहे अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी शनिवारी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post