शहरात आढळला आणखी एक कोरोना बाधित रुग्ण; एकूण संख्या आता १८


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यातील संशयीत कोरोना बाधीत व्यक्तीचे आणखी 73 व्यक्तींचे घशातील स्त्राव घेवून ते तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. यात, कोल्हार, शेवगाव आणि श्रीगोंदा येथील व्यक्तींचा समावेश आहे.
दरम्यान शनिवारी सायंकाळी नगरच्या मुकूंदनगरच्या स्थानिक असणार्‍या एकाचा कोरोना बाधीताचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. यामुळे नगरमधील कोरोना बाधीताचा आकडा 18 वर पोहचला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post