महाराष्ट्रात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मान्यता - आरोग्यमंत्री राजेश टोपे


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून आज मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सीमीटर व एक्सरे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले.

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post