महाराष्ट्रातात कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या वर


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई. राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018 झाली आहे. यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाचा अजून एक रुग्ण रत्नागिरीत सापडला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आजपर्यंत रत्नागिरीतील हा तिसरा रुग्ण आहे. ही एक 52 वर्षीय महिला असून ती गृहिणी आहे.

औरंगाबादमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्येमृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.मृत व्यक्तीचामुलगा आणि सूनेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तरदुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या17 वर्षीय मुलीलाही विषाणूची लागण झाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post