राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताद्वारे गरजूंसाठी मदतकार्य सुरूमाय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या स्वयंसेवकांनी गरीब कुटुंबांना किराणा देण्यास पुढाकार घेतला आहे . नुकतीच या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या किराणा किटमध्ये पाच किलो तांदूळ, तूरडाळ, साखर,  तेल पिशवी,  बेसन, मीठपुडा , मिरची पावडर , हळद , बिस्किट पुडे , अंगाचा साबण , कपड्याचा साबण , भांड्याचा साबण , चहा पावडर आदी १३ साहित्याचे किराणा किट जनकल्याण समितीने स्वयंसेवक यांच्या मदतीने तयार केले आहे . हे किट गरीब वस्त्यांमध्ये जाऊन स्वयंसेवक देत आहेत. 
या उपक्रमाला मदत करायची असल्यास जनकल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. सुधीर झरकर, उपाध्यक्ष अभय मेस्त्री, कार्यवाह डॉ. मनोहर देशपांडे, सहकार्यवाह संतोष दहिफळे , सेवाप्रमुख अशोक गायकवाड , हिराकांत रामदासी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


दानशुर व्यक्तींनी या बँक खात्यात मदत जमा करावी बँक : बँक ऑफ महाराष्ट्र , अकाउंट नंबर : २००९८३९०३२६ , आयएफसीआय कोड : एमएएचबी००००९३७ .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post