अहमदनगरकरांना पुन्हा दिलासा ; आणखी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेले १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

या व्यक्ती जामखेड, नगर, नेवासा, कोपरगाव, पारनेर येथील असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post