येस बँकेतून तिरुपती देवस्थानाने 1300 कोटी काढले होते; मात्र, जगन्नाथ देवस्थानाचे 592 कोटी अडकले


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई/ नवी दिल्ली - आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेच्या ग्राहकांत सध्या प्रचंड धास्ती आहे. येस बँकेच्या शाखा तसेच एटीएमवर शुक्रवारी ग्राहकांच्या लांब रांगा होत्या. गुरुवारी रात्रीच बँकेच्या बहुतांश एटीएममध्ये खडखडाट झाला. लोकांचा रोष पाहता मुंबईतील सर्व शाखांवर पोलिस तैनात करण्यात आले अाहेत. आरबीआयने या बँकेतून ५० हजारांहून अधिक रक्कम काढण्यास ३ एप्रिलपर्यंत मनाई केली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये अधिकच गोंधळ उडाला. येस बँकेच्या संकटात तिरुपती देवस्थान कसेबसे वाचले, कारण ट्रस्टने गेल्या महिन्यातच १३०० कोटी काढून घेतले होते. मात्र, भगवान जगन्नाथांचे ५९२ कोटी अडकले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सर्व पैसा सुरक्षित आहे. आरबीआयने येस बँकेसाठी मदत योजनाही सादर केली आहे.’ येस बँक संकटामुळे ऑनलाइन पेमेंट कंपनी फोनपेच्या सेवाही ठप्प.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post