मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर, शरयू नदीवरील महाआरतीचा कार्यक्रम रद्द
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जात असून सोबत रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील. साडेचार वाजता ठाकरे श्री रामांचे दर्शन घेतील. उद्धव ठाकरे हे रामलल्लांच्या कृपेने मुख्यमंत्री झाले आहेत. हा श्रीरामांचाच प्रसाद आहे असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. राऊत यांनी ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना लखनौ विमानतळावर ठाकरे उतरतील.
गर्दी होण्याची शक्यता पाहता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ते शरयू नदीवर महाआरती करणार नाहीत, असे सांगितले. केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाने विनंती केल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले.
Post a Comment