या घरगुती उपायाने करू शकता चेहऱ्यावरील चरबी कमी


माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर घरगुती उपाय करू शकता. या उपायांनी केवळ चेहऱ्यावरील चरबीच कमी होत नाही तर त्वचा नैसर्गिकरीत्या सुंदर आणि चमकदार होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरगुती उपाय केल्याने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तर, जाणून घेऊया घरगुती उपाय

दूध : दुधामुळे त्वचा अधिक टाइट होण्यासाठी मदत मिळते. तसेेच त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी एक पोषक तत्त्व म्हणून याचा उपयोग होतो. चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी दुधाचा दोन प्रकारे उपयोग करून घेऊ शकता.

थोडे कच्चे दूध घेऊन चेहरा आणि मानेवर मसाज करा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा. डबलचीन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

ताज्या दुधाच्या सायीमध्ये काही थेंब मध घाला. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावून काही मिनिट्स तसेच राहू द्या. नंतर थोड्या वेळाने थंड पाण्याने तोंड धुवा. असे नियमित केल्याने त्वचा अधिक चमकदार होते आणि चेहऱ्यावरील चरबी कमी व्हायला मदत मिळते.

काकडीचा वापर करा : फुगलेल्या चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी काकडीचा चांगला उपयोग होतो. फायबर आणि पाण्याचे प्रमाण काकडीमध्ये जास्त असते. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. चेहऱ्यावर याचा डायरेक्टली प्रयोग करू शकता. चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची सूज कमी करायला काकडीचा उपयोग होतो.

ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सने शरीरातील मेटाबॉलिजमसाठी आणि टॉक्झिन्स कमी होण्यासाठी मदत मिळते. किमान दिवसातून ३-४ कप ग्रीन टी पिणे आवश्यक आहे. तसेच, यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅफेन नसल्याने जास्त विचार करायची गरज भासत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला वजन कमी करायचे आहे त्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग करून घेता येतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post