कांदा चाळींसाठी 'या' जिल्ह्याला 22 कोटी 9 लाख रुपये मिळणार




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत उभारण्यात येणार्‍या कांदा चाळ योजनेसाठी राज्यासाठी 60 कोटी रकमेच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यासाठी बावीस कोटी 9 लाख रुपयांचा निधी येणार आहे. राज्यात सर्वाधिक निधी नगर जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे.

शेतकर्‍यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा व्यवस्थित राहून त्याची टिकवण क्षमता काही प्रमाणात वाढवण्यासाठी कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे. एकट्या नगर जिल्ह्यात हजारो शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून पडताळणी करून नंतर अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली जाते.

सन 2019-20 मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ‘कांदाचाळ उभारणी प्रकल्प’ राज्यात राबविण्यास 60 कोटींच्या निधी वितरणास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रकल्प 50ः50 या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या मापदंडानुसार अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटी निधी आरकेव्हीवाय अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विभागाच्या हॉर्टनेट प्रणालीद्वारे शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाईन मागवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची सोडत पध्दतीने निवड कर्‍यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या कांदा चाळीची उभारणी केुयानंतर त्याबाबतच्या नोंदी जिओ-टॅगींगद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या सातबारा उतार्‍यावर नोंद केल्यानंतर अनुदान अदा केले जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post