पायांच्या भेगांवर करून पाहा हे घरगुती उपाय...



माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - पायाला भेगा पडणे सामान्य गोष्ट आहे. मात्र यामुळे पायांना त्रास होतो. हिवाळा असो की उन्हाळा पायाला भेगा पडतच असतात. त्यामुळे पायाची काळजी घेणे गरजेचे आहे. पायाची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय...

> झोपताना पाय स्वच्छ धुवून हर्बल डेव्हलपर क्रीम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.

> कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

> लोणी, आंबेहळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो.

> बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरावे.

> चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यास भेगा कमी होतात.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post