अभिनेता अक्षय कुमारने दिले 25 कोटीमाय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली- देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगाने वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार लॉकडाउनच्या काळात योग्य उपाययोजना करत आहेत. यातच आता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संकटाशी सामना करण्यासाठी 'पीएम-केअर फंड' सुरू केला आहे. त्यांनी देशातील नागरिकांना यात दान करण्याची अपील केली आहे.
यावेळी मोदी म्हणाले की, हा फंड कोरोनासह इतर अनेक वेळेस संकटसमयी देशातील जनतेच्या मदतीसाठी वापरण्यात येईल. मोदींच्या या अपीलनंतर अवघ्या 20 मिनीटात अभिनेता अक्षय कुमारने या फंडमध्ये 25 कोटी रुपये दान केले आहेत.
मोदी पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या युद्धात प्रत्येकाला योगदान द्यायचे आहे. त्यांच्या या भावनेचा आदर करत पीएम-केअर फंड सुरू केला आहे. यात तुमच्या मर्जीने तुम्ही दान करू शकता. यामुळे देशाच्या आपत्ती व्यवस्थापनात बळ येईल आणि संकटसमयी हा पैसा देशाच्या कामी येईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post