महाराष्ट्र कोरोना / राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या 177 वर,
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई/पुणे/नागपूर/सांगली - महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव सुरूच असून आज सकाळी मुंबईत पाच तर नागपुरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. यामुळे राज्यातील रुग्णांचा आकडा शनिवार दुपरापर्यंतआता 177 वर पोहोचला आहे, तर मृतांचा आकडा 5 वर गेला आहे.
शुक्रवारी राज्यात एकाच दिवशी तब्बल 28 रुग्ण आढळले.यारुग्णांत इस्लामपूरमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा, तर नागपूरमध्ये गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या चार सहवासितांचा समावेश आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी 2 रुग्ण, तर पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. एक रुग्ण गुजरात राज्यातील आहे. आजवर राज्यात 24 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे हाेऊन घरी गेले आहेत.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 65 वर्षांच्या एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा राज्यातील पाचवा बळी आहे. शुक्रवारीच मुंबईतील खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय संशयित कोरोना डॉक्टरचा मृत्यू झाला. त्यांचे 2 नातेवाईक इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही बसवलेला होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने खातरजमा होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात 22,118 खोल्यांची सज्जता केली आहे. तेथे ठिकाणी 55,707 खाटांची सोय होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post