निर्भयाच्या दोषींना फाशी दिली


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिक दाखल करत गुरुवारी रात्री उशिरा फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी आटोकाट प्रयत्न केला. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावली. यामुळे चारही नराधमांना दिल्लीतील तिहार तुरुंगात आज पहाटे ५.३० वाजा फाशी देण्यात आली.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
- सात वर्षांपूर्वी म्हणजेच 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला होता.
- सिनेमा पाहून आल्यानंतर मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते.
- त्यांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. विरोध केल्याने आरोपींनी तिच्या मित्राला एवढी मारहाण केली की तो बेशुद्ध झाला.
- यानंतर एकटीच असलेल्या निर्भयावर सहा नराधमांनी धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तर अनन्वित अत्याचार केले.
- तरुणीला गंभीर जखमी केल्यानंतर नराधमांनी दोघांना दक्षिण दिल्लीच्या महिपालपूरजवळच्या वसंत विहार परिसरात धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं.
- दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- मात्र 29 डिसेंबर रोजी उपचारांदरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातच तिने अखेरचा श्वास घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post